Wednesday, February 24, 2016

विद्यार्थ्यांसाठी संमोहन एक परीस

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यर्थीदशा असते. तसे आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो पण शालेय जीवन हे आपल्या आयुष्यतील महत्वाचे अंग आसते. शालेय जीवन हा फार मोठा काळ आहे. याच काळात आपण वयाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो.  याच काळात आपल्या जीवनाची, आयुष्याची जडण घडण होत असते. आपला स्वभाव, आपल्यातील गुण, अवगुण, जीवनाचे वेगवेगळे पैलू विकसित होत असतात. एकंदर पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी हा काळ खूप महत्वाचा असतो. विद्यर्थीदशेतच शारीरिक बदलासोबत होणारे मानसिक बदल आपल आयुष्य बदलवून टाकतात.
माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात येतात. सर्वसाधारण विद्यार्थांच्या समस्या ह्या समान असतात जसे अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रता नसणे, वाचलेले लक्षात न राहणे, चंचल मन, न्यूनगंड, अबोल स्वभाव, वाईट सवयी, भीती, ताण तणाव अश्या कितीतरी ... बऱ्याच वेळा कमी आत्मविश्वास किंवा इतर कुठल्यतरी कारणांमुळे होणारी कुचंबना मुलांना वाईट संगतीकडे ओढत नेते. त्यापायी कितीतरी मुले व्यसनाधीन झालेली असतात. पालकांना याची कल्पना पण नसते. माझ्याकडे आलेल्या पालकांची आपल्या मुलांबाबत कमी अधिक प्रमाणात ह्याच तक्रारी असतात.
आजपर्यंत  बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थांनी माझ्या कार्यशाळेत भाग घेऊन संमोहनाचा लाभ घेतलेला आहे. १० विचा किंवा १२ विचा निकाल लागला कि  मिठाई घेऊन येणारे, फोन करणारे पालक व विद्यार्थी पहिले कि मन प्रसन्न होऊन जाते. वर्गात जेमतेम पास होणारा मुलगा, उत्तम मार्गांनी पास झाल्याचे पालक अन्दाने सांगतात. भाषण  देण्याची भीती  वाटते सांगनारे मुले आज मोठ्या कंपनी मध्ये ट्रेनर म्हणून नौकरी करत आहेत. आत्मविश्वास वाढला असे सांगणाऱ्या मुलांचे फोन आल कि फार संतोष वाटतो.  व्यक्तिमत्व विकाससाठी संमोहन हे एक परिस आहे. संमोहनाद्वारे एकग्रता वाढवणे, स्मरणशक्ती विकसित करणे, भीती घालवणे, वाईट सवयींवर मत करणे अगदी सहज शक्य आहे. संमोहनातून आपले मनोबल वाढवणे अगदी सहज शक्य आहे कारण संमोहनात दिलेली प्रत्येक सूचना थेट अंतर्मनात उतरत असते.

Thursday, February 18, 2016

विचार

जीवनामध्ये आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या विचारांचा असतो. आपण जसे विचार करू, तसेच आपले व्यक्तिमत्व, स्वभाव घडत असते, तसेच आपण बनत असतो. आपल्या जीवनात आपल्या विचारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या यशाची गुरुकिल्ली हि आपल्या विचारात आहे कारण मन हे विचारांचे धनी आहे. आपण कुठल्या परीस्थित काय विचार करतो, तसेच आपले निर्णय असतात. आपल्या मनात दोन प्रकारच्या विचार येत असतात एक सकारत्मक आणि दुसरे नकारात्मक. आपला प्रत्येक विचार म्हणजे एक तरंग (wave ) मानला तर  प्रत्येक तरंगाला त्याची उर्जा (Energy )  असते. आता तुमचा विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला सकारत्मक उर्जा मिळेल आणि नकारात्मक असेल तर नकारत्मक उर्जा मिळेल.
मला कार्यशाळेत सर्वात जास्त लोकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे " सकारात्मक विचार कसा करायचा ? " कारण दिवसभरात तुम्ही वेगवेगळ्या परिस्थिती हाताळत असता, त्यामुळे तुमच्या मनात दिवसभर सकारात्मक विचार येउच शकत नाहीत. हे मी पण मान्य करतो. हे खर आहे. माझा सर्वाना एक प्रश्न आहे तुमच तुमच्या स्वतःबद्दल काय मत आहे ? तुमच्या नौकारीबद्दल काय मत आहे ? मी खात्रीशीर सांगतो तुमचे स्वतःबद्दलचे विचार सकारात्मक नाहीत. नौकारीबद्दल तर नाहीच नाही. आधी स्वतःबद्दल चांगला विचार करायला शिका. कुणीही भेटले कि तुम्ही तुमच्या दुखाचा पाढा त्याच्या समोर वाचता, आपण कसे कमनशिबी आहे हे त्याला पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करता. तुमचेच विचार तुमची प्रगती थांबवतात. कारण जेंव्हा तुम्ही दुसऱ्यांना पटवून सांगत असता, तेंव्हा ते तुम्हाला पटलेलं असते आणि तेच आपल मन सत्य आहे हे समजून आमलात आणत असते. जर रोज तुम्ही स्वतःला चांगल्या स्वयंसूचना दिल्यात, तर तुमचे विचार चांगले होतील यात तिळमात्र शंका नाही.
मनात आलेला एक विचार तुम्हाला आनंदी किंवा दुखी बनवून जातो. आपली प्रगती, आपली अधोगती हे आपल्या विचारांची फळे आहेत. सकारात्मक विचाराने काय होऊ शकते, यासाठी बाजारात हजारो पुस्तके आहेत. पण प्रत्येक पुस्तक तुम्हाला हेच सांगेल, आधी स्वतःबद्दल चांगला विचार करा, तरच जग तुमच्याबद्दल चांगला विचार करेल.  चांगले गुण कसे वाढवता येतील त्यवर भर द्या. शाळेत आपण कच्या विषयाचा अभ्यास जास्त करायचो, पण जगाच्या शाळेत जे छान जमत, येते त्याला विकसित करा. कच्च्या गोष्टी सोडून द्या, कारण त्या कच्च्या गोष्टी आपल्या मनात जास्त नकारात्मक विचार निर्माण करतात, आपला आत्मविश्वास कमी करतात.
जर मनात एकसारखे नकारात्मक विचार येत असतील तर, थोडा वेळ श्वास रोखून धरा. जितका वेळ रोखून धरता येईल, तितका वेळ रोखून धरा. आपोआप विचार कमी कमी होत जातील. रोज झोपताना सकारात्मक कल्पना मनात घेऊन झोपा, तुमचे विचार सकारात्मक होत जातील. संमोहनात जाऊन स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्या, तुमचे विचार सकारात्मक बनत जातील. तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला रंकाचा राव बनवतील तर नकारत्मक विचार रावाचा रंक बनवतील. दिवसातून दहा वेळा I am the Best हे वाक्य पुटपुटा, काही दिवसात त्याची किमया तुम्हाला दिसेल. कुठलेही काम सुरु करताना काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची कल्पना करा, ते आपोआप यशस्वीरित्या पूर्ण होईल.