Friday, August 12, 2016

माणूस' म्हटलं की तो चांगलाही वागणार आणि वाईटही वागणार. सतत आयुष्यभर चांगल वागणारा, बोलणारा माणूस शोधणे अवघड आहे. चांगले आणि वाईट एका नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्यात चांगले किती व वाईट किती आहे, हे आपले आपल्याला कळत नाही. कुणी स्तुती केली की आपल्यातल्या चांगुलपणाचे दर्शन घडते, व आपण कुणाला वाईट, टाकून बोललो की दुस-या स्वभावाचे दर्शन घडते.
खरंतर अनेक चांगल्या गोष्टी असतात पण आपण मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. माणसं सहज काही बोलून जातात, आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. आपल्या अंगावर झुरळ चढलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच कोणी वाईट बोललं तर ते मेंदूत साठवून न ठेवता झुरळासारखं झटकून टाकता आलं पाहिजे.

No comments:

Post a Comment