Sunday, January 31, 2016

संमोहनाचे फायदे





आपले जीवन अधिक यशस्वी करण्यासाठी गुण वाढीस लागले पाहिजेत व दोष दूर झाले पाहिजेत. दोष, वाईट सवयी 

आयुष्यातून काढून टाकण्यासाठी संमोहनाचा वापर फार उपयुक्त ठरतो. संमोहन म्हणजे थेट आंतर्मानाशी हितगुज 

घालणे होय. माणसाचा स्वभाव, वागणे-बोलणे, आचार-विचार, व्यक्तिमत्व हे सगळ आंतर्मानाशी निगडीत आसत. 

त्यामुळे संमोहन शिकून आपण आपला स्वभाव, दृष्टीकोन सहज बदलू शकतो.

 
 संमोहन उपचारांचा खरा फायदा होतो तो व्यक्तिमत्व विकासासाठी. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विचार करता मानवी 

स्वभावाची वैशिष्ट्ये, जसे राग, द्वेष, अहंकार, न्यूनगंड, सर्व प्रकारची भीती, चीडचीडेपणा, आसक्ती, चंचलता, या 

सारख्या त्रासदायक भावना दूर करण्यासाठी व मनात आनंद, प्रेम, उत्साह, एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास,

जिद्द, इच्छाशक्ती, सकारात्मकता, कल्पनाशक्ती, सभाधीटपणा, एखाद्या विषयातील आवड, गोडी वाढविण्यासाठी, 

अंगातील सुप्त कलागुणांचा व क्रीडाकौशल्याचा विकास करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच वर्तनातील अनेक चुकीच्या, 

वाईट सवयी दूर करण्यासाठी, कोणत्याही वाईट व्यसनातून मुक्त होण्यासाठी, दैनंदिन जीवनातील ताणतणावातून मुक्त 

होण्यासाठी संमोहन सूचनांचा निश्चितच खूप प्रभावी वापर होऊ शकतो.