Friday, March 25, 2016

प्रार्थनेचा चमत्कार


आपण आपल्या जीवनात इतरांकडे असलेल्या सुखामुळे जास्त दु:खी होतो. सर्व आपल्यजवळ आहे पण आपण त्याची तुलना इतर लोकांजवळ असलेल्या सुखासोबत करत राहतो. परिणाम आपणच आपल्या जीवनात सुखापेक्षा दु:खाला जास्त महत्व देतो. मग सुख मिळणार कुठून ? जंगलातील कावळ्याची गोष्ट सर्वाना माहित आहे, त्या गोष्टीच महत्व सर्वाना समजत पण ते वर वर. मनाच्या कोपऱ्यात आपण दु:खीच असतो. सर्व आपल्याला समजते पण उमजत नाही. आपण आपल्यजवळ जे आहे त्याची किंमत केली तर आपल्या सारखे सुखी आम्हीच. आपल्यासारखे आयुष्य मिळावे म्हणून कुणी देवाजवळ प्रार्थना करते पण आपल्याला त्याची किमत नसते. 
काय होईल जर तुम्ही रोज तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक वस्तूबद्दल, प्रत्येक सुखाबद्दल, मिळालेल्या प्रत्येक पैशाबद्दल देवाचे आभार मानलेत ? मी अनुभवाने सांगतो तुमच आयुष्य सुखाने, समृद्धीने, समाधानाने, धनाने भरभरून जाईल. रोज सकाळी आणि रात्री  देवासमोर हात जोडून खालील प्रार्थना मनापासून म्हणा आणि बदल न जाणवल्यास मला सांगा.  रोज करायची प्रार्थना:

1. आजचा दिवस मला बघता आला, त्याबद्दल मी त्या परमपित्या  परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे.
2. मी माझ्या निरोगी शरीराचा, माझ्या शरीरामध्ये वास करणाऱ्या आनंदी मनाचा आणि त्या शक्तिमान आत्म्याचा अत्यंत आभारी आहे.  विश्वामध्ये माझे अस्तित्व टिकवून ठेवल्याबद्दल मी या तिघांचा ऋणी आहे, आभारी आहे.
4. मी माझे आई-वडील, सर्व कुटुंबीय, नातलग, आप्तगण, गुरुवर्य यांचा ऋणी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी  केलेल्या मार्गदर्शनामुळे, मदतीमुळेच मी यशस्वी होऊ शकलो याची मला पूर्ण जाणीव आहे.
5. मी मझ्या बायकोचा व मुलाचा ऋणी आहे. यानी माझे आयुष्य  सुखी बनवले, आनंदी बनवले, माझ्या जीवनाला एक चांगली दिशा दिली  त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
6.  मी माझ्या मित्रांचा, सहकार्यांचा व त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांनी कळत किंवा न-कळत मला मदत करून माझे आयुष्य  सुखी बनवले, आनंदी बनवले. मी माझे मित्र, सहकारी यांच्या प्रगतीबद्दल आनंदी आहे, समाधानी आहे.
7. माझ्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे. कळत-नकळत जर कुणी दुखावले असेल तर मी त्या सर्वांची क्षमा मागतो. त्या सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करावी अशी मी विनंती करतो.  तसेच कुणाच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, कळत-नकळत जर मी  दुखावलो असेल तर मी त्या सर्वाना आनदाने माफ करतो.
8. तो परमेश्वर हा माझा पालनकर्ता आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्याच्या कृपेने माझ्या जीवनात सुख, शांती, समाधान, चांगले आरोग्य व धनसंपदा भरभरून वाहत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ईश्वर मला मार्गदर्शन करत आहे व त्याच्या मार्गदर्शणामुळे मला भरपूर फायदा होत आहे.
9. मी करत असलेले प्रत्येक कार्य हे परमेश्वराचेच कार्य आहे व त्यातून मला प्रेम, आनंद व समाधान मिळते.  माझ्या प्रत्येक कृतीतून सर्वांचे कल्याण होत आहे, प्रगती होत आहे याचा मला आनंद आहे. या असीम कृपेबद्दल मी ईश्वराचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे.
 
ईश्वर सर्वाना सुख, शांती, समाधान, चांगले आरोग्य व धनसंपदा भरभरून देओ अशी मी ईश्वराला  प्रार्थना करतो.

No comments:

Post a Comment