Thursday, September 1, 2016

विचार धन

'वेळ' आणि 'अनुभव' यापेक्षा मोठे 'गुरू' नाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती 'शांत' राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे थेंबे' संचयच करावा लागतो. 

तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची 'प्रगल्भता' असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दुष्टीने चांगले असु शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कुष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्व:ताच्या नजरेत चांगल असलं पाहिजे,, ''लोक तर देवाला पण नावं ठेवतात."
        

जीवनाचे सार

एक  दिवस शाळेला सुट्टी असल्याची  घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार  पाच  वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का?  याचे उत्तर त्याच्या  वडीलांनी  दोन ओळीत दिले  त्यात पूर्ण  जीवनाचे सार सांगितले  ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते  कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.म्हणून जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही.

⛳✍