Sunday, September 4, 2016

स्वतःवर विश्वास ठेवा

एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच  विचार केला फार प्रयत्न केले. त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर
काढण्याचे पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.
दिवस मावळायला आला होता शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला . 'आता हा घोडातर असेही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी... घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्व लोकांकडून त्याने मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले hकुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला ... ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागला... वरुन माती पडतचं होती... काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला ..... सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक. शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले तर तो पहातचं राहीला... अंगावरची माती झटकत घोडाउभा राहीला होता.. लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले... परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा राहीचा ......असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा  तो कठडा ओलांडून बाहेर आला....

आयुष्यात वेगळे तरी काय होतं ??? आपण खड्यात पडलो तर आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात... म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा .... आपले डोके नेहमी शांत ठेवा . 

No comments:

Post a Comment