Monday, February 1, 2016

संमोहनाबद्दल थोडेपार



आजकालच्या काळात समाजामध्ये आता संमोहनाबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली आहे. त्यापैकी काही शास्त्रीय तर काहीअशास्त्रीय ऐकीव माहिती सुद्धा आहे. संमोहन हे तसे भारतीय योग विद्येचे अंग पण परकियांच्या आक्रमणामुळे मागे पडले व परदेशात जाऊन विकसित झाले. संमोहनामध्ये तुम्हाला कृत्रिम झोपेत नेल जात ज्या मध्ये तुमच बाह्यमन पूर्णपणे झोपी जाते आणि सर्व संवाद हा आंतर्मानाशी चालू आसतो.  

संमोहनाच्या तीन अवस्था आहेत.
१. प्राथमिक अवस्था: हि अवस्था मंजे हलकी गुंगीची अवस्था आसते. तुम्ही संमोहनात असून सुद्धा पूर्णपणे शुद्धीत असता. ह्यामध्ये संमोहित व्यक्तीला संमोहनातून बाहेर आल्यावर सर्व काही आठवत आसते. 
२. मध्यम अवस्था: प्राथमिक अवस्थेच्या अधिक वरच्या पातळीवरची हि अवस्था आसते. ह्यामध्ये शरीरा च्या सर्व हालचाली बंद झालेल्या आसतात. मन बऱ्या पैकी एकाग्र झालेले आसते. बाहेरच्या कुठल्याही गोष्ठी पासून मन विचलित होत नाही.
३. गाढ अवस्था: हि गाढ निद्रेसारखी अवस्था असते. आजूबाजूची कोणतीही जाणीव सहसा राहत नाही. मनाला खूप आनंद आणि समाधान वाटत आसते.

संमोहन सर्वांवर होते का? शास्त्र असे म्हणते की ३०% लोक संमोहनाच्या पहिल्या अवस्थेत जातात,३०% लोक दुस-या अवस्थेत जातात व फक्त १०% लोक गाढ अवस्थेत जातात. उर्वरित ३०% लोक संमोहनात जातच नाहीत. पण लोकांच्या मनातील संमोहानाबद्दलची भीती व गैरसमज दूर केल्यास, त्यांना हे शास्त्र पटवून दिल्यास जवळ जवळ ९०% लोक संमोहनात जाऊ शकतात. अर्थात प्रत्येक वेळी अशीच परिस्थिती असेलच असे मुळीच नाही.
  
संमोहन करणाऱ्यांचे दोनप्रकार आजही दिसून येतात एक म्हणजे फक्त शास्त्र म्हणून मानणारे व दुसरे अध्यात्मिक शास्त्र म्हणून मानणारे.अध्यात्म मानणारे संमोहन तज्ञ सूचनांच्या प्रभावाबरोबरच संमोहन कर्त्याची इच्छाशक्ती, हातातून प्रवाहित होणारे संमोहन तरंग अर्थात पासेस, ओंकार, ध्यान-धारणा, त्राटक, प्राणायाम याबाबिना महत्व देतात; या उलट फक्त शास्त्र म्हणून मानणारे या बाबींना मानतच नाहीत. ते फक्त सूचनांचा प्रभावच मानतात.

संमोहनाचेही दोन भाग आहेत
  1. आत्मसंमोहन अर्थात स्वसंमोहन जे स्वतःपुरते मर्यादित आहे
  2. परासंमोहन अर्थात दुसऱ्यावर संमोहन करणे.



संमोहानाबाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे संमोहनात नेणाऱ्या पेक्षा संमोहनात जाणाऱ्यावर अधिक अवलंबून असते. ज्यांच्या मनाची एकाग्रता, सूचना ग्रहण क्षमता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास व इच्छाशक्ती चांगली ते सर्व संमोहनात सहज चांगल्या गाढ अवस्थेत जाऊ शकतात. या उलट चंचल, भित्र्या मनाच्या, नकारात्मक विचारांच्या, आत्मविश्वास नसलेल्या दुबळया मनाच्या व्यक्तींवर संमोहन तितकेसे चांगल्याप्रकारे होत नाही.




No comments:

Post a Comment