Wednesday, February 3, 2016

मन असते का ?



सहज कुठेतरी वाचण्यात आले " जग जिंकायचे असेल तर त्या जगातील माणसे जिंका, माणसे जिंकायची आसतील तर त्यांची मने जिंका आणि त्यांची मने जिंकायची असतील तर त्याचं  मन   कसे कार्य करते  ते शिका आणि त्यांची मने कशी कार्य करतात हे शिकायचे असेल तर आपल मन कस कार्य करते हे समजून घ्या ". यावरून एकाच गोष्ट लक्ष्य येते, जगाला  जिंकायचे असेल तर आधी स्व:ताच्या मनाला जिंका.

आपण नेहमी म्हणतो कि मी आज खूप आनंदी आहे, खुश आहे किंवा दु:खी आहे. मला एक विचारावेसे वाटते, जेंव्हा ह्या भावना सांगत असता, त्यावेळी  या सर्व भावनांचा तुमच्या शरीरावर काही फरक पडतो का. म्हणजे आनंदी असता तेंव्हा शरीराला थंडी वाजते का, गर्मी होते का ? किंवा दु:खी असता तेंव्हा शरीराला खाज सुटणे असं काही होत का ? नाही ना. मग आनंद होतो तो कोणाला, दु:ख होते ते कुणाला.  मी म्हणजे कोण, तुमच शरीर की आणखी कुणी. लगेच तुमच उत्तर येईल , मी म्हणजे माझ मन.

माझ्या कार्यशाळेत मी अनेकांना विचारलेला प्रश्न " माणसाला मन असते का? " सर्व डोळे विस्फारून एकच उत्तर देतात " हो, असते ". माझा दुसरा प्रश्न " मन शरीराच्या कुठल्या भागात आसत, त्याचा रंग कुठला आहे, आकार कसा आहे ? " सर्वजण चूप.

आपल्याला मन आहे, पण ते कुठे आहे हे कुणालाच सांगता येत नाही. कुणी मन्हत ते डोक्यात आहे, कुणी सांगते ते हृदयात आहे असे वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळतात. सर्व जगाला माहित आहे कि मानवाला मन आहे, पण त्याच शरीरात स्थान कुठे यावर अनेक  मतभेद आहेत.  यावर खूप संशोधन झाली आणि चालू आहे.

वर सांगितल्या प्रमाणे सुख, दु:ख जेंव्हा ह्या भावना  निर्माण होतात, तेंव्हा त्या शरीराच्या विशिष्ट एकाच भागात निर्माण होतात का ? म्हणजे आपण आपला हात दुखतो, पाय दुखतो, डोक दुखते असे बोलतो पण फक्त माझा पाय आनंदी आहे, डोक आनंदी आहे असं  मी कधी ऐकल नाही.  आनंद होतो तो  शरीराच्या सगळ्या अवयवांना होतो तसेच दु:ख होते ते सुद्धा सर्व शरीराला होते. म्हणजे मन हि संकल्पना आपल्या शरीराच्या सर्व भागात आहे. आपल सर्व शरीर मन ह्य संकल्पनेन व्यापलेलं आहे.

निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे मानसाच मन. मनाची अफाट शक्ती ज्याला वापरता आली तो कुठल्याही परीस्थित प्रगती करतो. मानवी मन हे इतके अगाध आहे कि त्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासाच्या शाखा आहेत. हा झाला संशोधनाचा विषय.

शास्त्रानुसार मानवाला दोन प्रकारची मने असतात एक म्हणजे बाह्यमन आणि दुसरे अंतर्मन. एकूण मनाच्या १०% भाग हा बाह्यमनाने व्यापलेला आसतो तर ९०% भाग हे मानवाचे अंतर्मन असते. माणसाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, वागणूक, आचार-विचार हे सर्व मनाच्या कार्यभागात येते. मानवाच्या जडणघड्नेत त्याच्या मनाचा मोलाचा वाटा असतो.

No comments:

Post a Comment