Wednesday, February 10, 2016

इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती


माझ्याकडे एक गृहस्थ आले होते. ते शेअर बाजाराचा व्यवसाय करायचे आणि खूपच त्रासलेले वाटत होते. त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत सूर हा नकारात्मक होता. त्यांना प्रत्येक गोष्ट त्रासदायकच वाटायची. बोलताना लक्ष्यात आल कि यांना शेअर बाजारात नफ्यापेक्षा नुकसान जास्त होते. याच कारण शोधल तेंव्हा लक्ष्यात आल कि ट्रेड करताना ते  नुकसान होण्याच्या भीतीमुळे भयानक अस्वस्थ व्हायचे. ती अवस्थता एवढी जास्त असायची  कि त्या भीतीमुळे ते योग्य निर्णय असून, इच्छा असून सुधा ट्रेड करत नसत आणि नंतर वेळ निघून गेल्यावर आपण ट्रेड केला नाही, आपल्याला फायदा झाला असता या विचार मुळे भयंकर चिडचिड करत. आपण मुर्ख आहोत, आपल्याला निर्णय घेत येत नाही, आपल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही यासारखे विचार दिवसभर डोक्यात थैमान घालायचे. याच विचरामुळे  त्यांचे ट्रेडिंग निर्णय पण चुकायला लागले. शेवटी परिणाम जो व्हायचा तोच झाला. वारंवार असाच विचार केल्यामुळे ते विचार थेट त्यांच्या अंतर्मनाने स्वीकारले आणि तसच त्याचं व्यक्तिमत्व बनल. याचाच अर्थ असा कि ट्रेड करायची इच्छा असूनही त्यांची नुकसान होण्याची कल्पना त्यांना हव ते करू देत नव्हती. इच्छाशक्ती पेक्षा कल्पनाशक्ती प्रभावी ठरत होती.

आपल्याही आयुष्यात असे बऱ्याच वेळेला होते. प्रंचड इच्छा असूनही फक्त नुकसान होण्याच्या कल्पनेने, लोक काय म्हणतील या कल्पनेने आपण अनेक सुवर्णसंधी सोडून देतो आणि नंतर पश्याताप करत बसतो. आपल्या जीवनात नेहमीच कल्पनाशक्ती इच्छाशक्ती पेक्षा प्रभवि ठरते. ज्या माणसाच्या आयुष्यात या दोन्ही शक्ती सोबत काम करतात त्यांची प्रगती झपाट्याने होते. ती यशाची शिखरे भरभर पार करत असतात.

कल्पनाशक्ती आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडू द्यायला तयार नसते किंवा रिस्क घेतल्यावर काय नुकसान होईल याच चित्र १०० गुणे जास्त नकारात्मक पद्धतीने समोर उभे करते. त्यामुळे आपण इच्छा असूनही निर्णय घेण्यास कचरत आसतो.

माझ्या कार्यशाळेत संमोहनाद्वारे  कल्पनाशक्ती सकारात्मक रूपाने कशी वापरायची, इच्छाशक्ती कशी प्रबळ करायची या गोष्टी मी प्रकर्षाने शिकवतो.

No comments:

Post a Comment