Tuesday, February 9, 2016

मानवी मनाबद्दल थोडेफार .......


मानवाच संपूर्ण जीवन हे मन या संकल्पनेन व्यापून टाकल आहे. आपला स्वभाव, वागणूक, व्यवहार, व्यक्तिमत्व हे आपल्या मनाच्या कार्यशाळेत येत. कुठल्याही प्रसंगामध्ये, प्रसंगानुरूप भावना निर्माण करण्याच महत्वाच काम मन करत असते. राग, भीती, आनंद, हर्ष ह्या सर्व भावना मनात प्रसंगानुसार तयार होतात. मानवच मन प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकत असत, घेत आसत ते आपल्यासाठी चांगल पण असेल किंवा वाईट पण असू शकत. वारंवार घडणाऱ्या गोष्टी मनावर खोल परिणाम करतात. काही गोष्टी नकळत मनात उतरतात आणि आपल स्थान पक्क करतात. 
मानवाला एकच मन असून त्याचे दोन कप्पे आहेत एक म्हणजे बाह्यमन अनु दुसरे अंतर्मन. प्रत्येक मनाच कार्य हे वेगवेगळी आहेत. या दोन्ही कप्प्यांमध्ये पुसट आशी रेषा आहे. दोन्ही कप्पे फार महत्वाचे आहेत. त्यांची कार्य हि परस्परांवर अवलंबून आहेत.

बाह्यमन हे चौकस आहे. आपल्यासाठी चांगले काय, वाईट काय हा सारासार विचार करण्याच कार्य त्याच्याकडे आहे. निर्णय घेणे, लॉजिक लावणे ह्या गोष्टी बाह्यमनाच्या कार्य क्षेत्रात येतात. आलेल्या विचाराना अंतर्मनाकडे पाठवण्याच काम हे बाह्यमन करत. पण एकूण मनाच्या १०% एवढाच कप्पा हा बह्यामानाचा आसतो. उरलेला सर्व ९०% भाग हे अंतर्मन असते.
  
अंतर्मन हे अफाट आहे, त्याची ताकत अफाट आहे पण त्याला चांगल काय, वाईट काय हे समजत नाही. सारासार विचार करण्याचे काम त्याचाकडे नाही. आपल बाह्यमन जे त्याला देईल ते सर्व अंतर्मन स्वीकारत आणि त्यानुसार कार्य करत. आपल्या आयुष्यतील सर्व घटनांच रेकॉर्डिंग आपल्या अंतर्मनात होत असते. प्रसंगानुसार भावना निर्माण करण्याच काम पण अंतर्मन करते. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया अंतर्मन पार पडत. शरीरातील रक्ताभिसरण नियंत्रित ठेवणे, श्वासोच्वास चालू ठेवणे, शरीरात आलेल्या अन्नाला पचवणे व गरजेनुसार वेगवेगळ्या भागाकडून हवे तसे कार्य करून घेण्याच कार्य हे अंतर्मनाच आहे. एकंदर मानवाला सचेत ठेवण्याच काम हे अंतर्मन करत असते.


मन कस काम करते हे आपण बघू. आपण सर्वांनी Titanic हा सिनेमा बघितला असेल. त्या सिनेमा मध्ये जहाजाचा अपघात होतो आणि पुढचा सर्व अनर्थ ओढवतो. माझा प्रश्न जहाचा अपघात का होतो ? जहाजाच्या वर समोरच्याभागाची टेहळणी करण्यासाठी दोन गार्ड बसवलेले असतात. त्यांचा काम असते कि समोर काही अडथला दिसल्यास तशी सूचना अगोदर देणे आणि त्यांच्या सूचनेनुसार जहाजाच्या तळमजल्यातील कामगार काम करत असतात. जहाजाचे सर्व कार्य म्हणजे जहाज चालू ठेवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा हे कामगार हाताळत असतात. तळमजल्यातील कामगारांना जहाज कुठल्या दिशेने जाणार, समोर काय आहे हे काहीही माहित नसते कारण त्यांना ते दिसतच नसते. ते फक्त आलेल्या सूचनांच तंतोतंत पालन करत असतात. 

आपण पण एक जहाजस्वरूपी शरीर वागवत आहोत. शरीर सचेत ठेवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा हि आपले अंतर्मन हाताळत असते. त्याला बाहेरच्या जगाशी काही घेण- देन नसत.चांगल काय, वाईट काय हे समजत नाहीत. ते फक्त बाह्यमनाकडून आलेल्या सूचनांच पालन करत असते, त्या आमलात आणत आसते. बाह्य मानाने दिलेल्या सूचना / विचार सकारत्मक आहेत, नकारत्मक आहेत हे अंतर्मनाला समजत नाही. दोन्ही प्रकारच्या सूचना / विचार अंतर्मनासाठी सारख्याच असतात. दोन्ही प्रकारच्या सूचना ते तेवढ्याच प्रभविपणे आमलात आणत असते.

अंतर्मन सर्व सूचना विचार हे चित्राच्या स्वरुपात बघत असते. त्यामुळे अंतर्मनाला "नाही, नको" असे क्रियापद असलेले वाक्य चित्रात बदलता येत नाहीत. आपण एखद्या व्यक्तीला, एखादे काम करू नकोस असे वारंवार सांगूनही ती व्यक्ती तेच काम करते. आपल्याला हत्तीचा विचार करू नका असे सांगितले तरी आपण हत्तीचाच विचार करतो. कारण हत्ती म्हटले कि  हत्तीचे चित्र अंतर्मनात निर्माण होते पण "नका" या शब्दाचे काहीही चित्र निर्माण होत नाही. वारंवार येणारे विचार, भावनेच्या भरात येणारे विचार थेट अंतर्मनात जातात.

जर तुमचे सकारात्मक विचार अंतर्मनाला मिळाले तर ते सकारात्मक भावना निर्माण करेल आणि नकारात्मक मिळाले तर नकारत्मक भावना निर्माण होतील. सांगायचे तात्पर्य एवढेच कि अंतर्मनाला जसे विचार देऊ, तसे तुमचे व्यक्तिमत बनते.

No comments:

Post a Comment