Thursday, February 11, 2016

संमोहनातून भीतीचे निर्मुलन

प्रत्येक माणसाला कसली ना कसली भीती वाटत असते. तस बघितलं तर भीती हि फक्त एक कल्पना आहे, तीच भौतिक अस्तित्व काहीच नाही. पण भीती हि कल्पना पण इतकी जबरदस्त प्रभावी आहे कि त्यामुळे भल्याभल्यांचे त्राण निघून जातात. भीती हा आपला खूप मोठा शत्रू आहे. आपण लहान असताना आई वडील,आप्तगण वेगवेगळ्या गोष्टींची भीती घालत असतात. नकळत आपलं अचेतन मन ते सर्व सत्य आहे असं समजत असते. आपण मोठे झालो तरी काही गोष्टींची भीती आपल्या मनात तशीच राहते. आजून माझे बरेच मित्र अंधाराला घाबरतात. त्याच कारण त्यानाही माहित नसते. आपल्या सभोवतालचे वातावरण पण नकळत काही गोष्टींची भीती आपल्या मनात पेरत असते.

प्रत्येकाच्या भीतीचे प्रकार वेगळे असतात. कुणाला कश्याची भीती वाटेल ह्याची आपण कल्पना सुधा नाही करू शकत. भीतीचे स्वरूप साधारण असेल तर ठीक आहे. पण जेंव्हा हि भीती वाढत जाते तेंव्हा आपले आयुष्य आणखीनच खडतर बनत जाते. माझ्या कार्यशाळेत आलेल्या लोंकाना भीती पासून सुटका हवी असते. कुणाला बसमध्ये बसण्याची भीती, कुणाला लिफ्टमध्ये जाण्याची भीती, कुणाला गाडी चालवण्याची भीती, कुणाला काम करताना चुका होण्याची भीती. अश्या नानाप्रकारच्या भीतीने लोग ग्रासलेले असतात. अनेकांना त्यांना वाटणाऱ्या भीतीचे कारण पण माहित नसते. ते कारण त्यांच्या अंतर्मनात असते. कुठेतरी काही घटना घडलेली बघितलेली असते, काही ऐकलेले आसते, कधीतरी काहीतरी चूक झाल्यमुळे अपमान झालेला असतो अशी कितीतरी कारणे असतात.

माझ्याकडे एक तरुण आला होता. त्याला कुणाचे भांडण ऐकले, भांडण बघितले तरी दोन दोन दिवस शौचालय होत नसे.तो या प्रकाराला खूपच त्रासला होता. कारण २-३ दिवसात त्याला रस्त्यावर किंवा कुठेतरी कुणीतरी भांडताना दिसायचे. त्यांनी खूप औषध, चूर्ण घेतली पण कुठल्याही औषधांचा, चूर्णाचा त्यांना उपयोग झाला नाही. औषध घेतली कि आराम वाटायचं पण औषध बंद झाल कि त्रास चालू. शेवटी त्यांना माझा नंबर मिळाला आणि परवानगी घेऊन महाशय हजर. असे का होते विचारले तर ते पण माहित नाही. कधीपासून होते हे विचरले तर ते पण नक्की आठवत नाही. मग माझ्याकडे त्यांना संमोहनात घेऊन जाने हा एकाच पर्याय होता. संमोहनात गेल्यावर मी त्यांना हा त्रास कधीपासून होतो, का होतो याचे कारण शोधले. ते ६-७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांसोबत बसने त्यांच्या मामाच्या गावी चालले होते. त्यावेळी बस मध्ये जागेवरून वडिलांचे इतर लोकांसोबत बाचाबाची झाली. नंतर त्याचे रुपांतर भांडणात होऊन मारामारीवर आले. त्या भांडणात वडिलांना मार लागला. बसमधील लोकांनी ते भांडण कसे तरी सोडवले पण त्या घटनेचा परिणाम यांच्या मनावर झाला. तेंव्हापासून त्यांना हा त्रास चालू झाला. अगोदर त्रासाचे स्वरूप साधारण होते पण काही वर्षांनी हे वाढच गेले. त्यांच्या मनात बसलेल्या घटनेचा परिणाम मनातून संमोहनाद्वारे काढून टाकताच त्यांचा त्रास पण पूर्ण बारा झाला.

अश्या कितीतरी घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. काही थेट अंतर्मनात उतरतात आणि त्याचे परिणाम आपल्याला त्रासाच्या स्वरुपात जाणवतात. आपल्यलाला त्याचे कारण पण माहित नसते. पण त्या अंतर्मनात साठवलेल्या असतात.

संमोहनाद्वारे मनात बसलेल्या अश्या घटनामुळे निर्माण झालेली भीती काढून टाकता येतात. त्या भीतीमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेत येते. कारण संमोहनात आपण थेट अंतर्मनाशी संवाद करत असतो.

No comments:

Post a Comment