Thursday, February 18, 2016

विचार

जीवनामध्ये आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या विचारांचा असतो. आपण जसे विचार करू, तसेच आपले व्यक्तिमत्व, स्वभाव घडत असते, तसेच आपण बनत असतो. आपल्या जीवनात आपल्या विचारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या यशाची गुरुकिल्ली हि आपल्या विचारात आहे कारण मन हे विचारांचे धनी आहे. आपण कुठल्या परीस्थित काय विचार करतो, तसेच आपले निर्णय असतात. आपल्या मनात दोन प्रकारच्या विचार येत असतात एक सकारत्मक आणि दुसरे नकारात्मक. आपला प्रत्येक विचार म्हणजे एक तरंग (wave ) मानला तर  प्रत्येक तरंगाला त्याची उर्जा (Energy )  असते. आता तुमचा विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला सकारत्मक उर्जा मिळेल आणि नकारात्मक असेल तर नकारत्मक उर्जा मिळेल.
मला कार्यशाळेत सर्वात जास्त लोकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे " सकारात्मक विचार कसा करायचा ? " कारण दिवसभरात तुम्ही वेगवेगळ्या परिस्थिती हाताळत असता, त्यामुळे तुमच्या मनात दिवसभर सकारात्मक विचार येउच शकत नाहीत. हे मी पण मान्य करतो. हे खर आहे. माझा सर्वाना एक प्रश्न आहे तुमच तुमच्या स्वतःबद्दल काय मत आहे ? तुमच्या नौकारीबद्दल काय मत आहे ? मी खात्रीशीर सांगतो तुमचे स्वतःबद्दलचे विचार सकारात्मक नाहीत. नौकारीबद्दल तर नाहीच नाही. आधी स्वतःबद्दल चांगला विचार करायला शिका. कुणीही भेटले कि तुम्ही तुमच्या दुखाचा पाढा त्याच्या समोर वाचता, आपण कसे कमनशिबी आहे हे त्याला पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करता. तुमचेच विचार तुमची प्रगती थांबवतात. कारण जेंव्हा तुम्ही दुसऱ्यांना पटवून सांगत असता, तेंव्हा ते तुम्हाला पटलेलं असते आणि तेच आपल मन सत्य आहे हे समजून आमलात आणत असते. जर रोज तुम्ही स्वतःला चांगल्या स्वयंसूचना दिल्यात, तर तुमचे विचार चांगले होतील यात तिळमात्र शंका नाही.
मनात आलेला एक विचार तुम्हाला आनंदी किंवा दुखी बनवून जातो. आपली प्रगती, आपली अधोगती हे आपल्या विचारांची फळे आहेत. सकारात्मक विचाराने काय होऊ शकते, यासाठी बाजारात हजारो पुस्तके आहेत. पण प्रत्येक पुस्तक तुम्हाला हेच सांगेल, आधी स्वतःबद्दल चांगला विचार करा, तरच जग तुमच्याबद्दल चांगला विचार करेल.  चांगले गुण कसे वाढवता येतील त्यवर भर द्या. शाळेत आपण कच्या विषयाचा अभ्यास जास्त करायचो, पण जगाच्या शाळेत जे छान जमत, येते त्याला विकसित करा. कच्च्या गोष्टी सोडून द्या, कारण त्या कच्च्या गोष्टी आपल्या मनात जास्त नकारात्मक विचार निर्माण करतात, आपला आत्मविश्वास कमी करतात.
जर मनात एकसारखे नकारात्मक विचार येत असतील तर, थोडा वेळ श्वास रोखून धरा. जितका वेळ रोखून धरता येईल, तितका वेळ रोखून धरा. आपोआप विचार कमी कमी होत जातील. रोज झोपताना सकारात्मक कल्पना मनात घेऊन झोपा, तुमचे विचार सकारात्मक होत जातील. संमोहनात जाऊन स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्या, तुमचे विचार सकारात्मक बनत जातील. तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला रंकाचा राव बनवतील तर नकारत्मक विचार रावाचा रंक बनवतील. दिवसातून दहा वेळा I am the Best हे वाक्य पुटपुटा, काही दिवसात त्याची किमया तुम्हाला दिसेल. कुठलेही काम सुरु करताना काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची कल्पना करा, ते आपोआप यशस्वीरित्या पूर्ण होईल.

3 comments:

  1. It's awesome sir...power of positivity...i would like to thank you for such type of blog

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete