Wednesday, February 10, 2016

संमोहनाबद्दल असलेले गैरसमज


आपल्याकडे संमोहनाचा प्रचार अजून हवा तसा झाला नसल्याने, संमोहनाबद्दल बरेच गैसमज समाजात प्रसारित आहेत. अनेकजण संमोहनाचा संबंध काळी विद्या, जादूटोणा, भानामती अश्या चुकीच्या गोष्टींशी जोडतात.  समजातील सर्व स्तरातील लोकांना संमोहनाबद्दल अपुरी माहिती आहे त्यामुळे संमोहनाचा उपयोग कसा होतो हेच त्यांना समजत नाही. लुबाडण्याचे, फसवणुकीचे प्रकार थेट संमोहनाशी जोडले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून संमोहनाचे  परिणाम मसाला लावून दाखवल्यामुळे, संमोहनशास्त्र अधिकच बदनाम झाले आहे. माझ्या कार्यशाळेत येणाऱ्या लोंकाच्या मनात येणारे सर्वसाधारण  प्रश्न म्हणजे
१. व्यक्ती संमोहनकाराच्या आधीन होतो ?
२. संमोहनात गेल्यावर नॉर्मल परीस्थित वापस येता नाही आले तर ?
३. संमोहनात तुमच्या मनातील गुपिते काढून घेता येतात.
४. अंगावरचे मौल्यवान दागिने/ वस्तू काढून घेता येतात.
५. बँकेचे / ATM चा password काढून घेतला जातो.
६. स्त्रियांचा विनयभंग केला जातो. 
७. सुंदर मुलींना नादी लावता येते.
८. एखाद्याचा खून करायला लावता येतो.

परंतू असे काहीही करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीला, व्यक्तीच्या संमती शिवाय,  इच्छेविरुद्ध संमोहित करताच येत नाहीसर्वात महत्वाचे म्हणजे जी गोष्ट जागेपणी करण्याची लाज वाटते ती गोष्ट संमोहनाच्या अवस्थेत देखील कोणीही कदापी करणार नाही. जे रहस्य तुम्हांला कोणालाही अगदी जवळच्या व्यक्तीलाही सांगावयाचे नाही ते संमोहनावस्थेत सुद्धा सांगणार नाही.

संमोहन म्हणजे एक झोपेसारखी अवस्था आहे. त्यामुळे संमोहनात गेलेली प्रत्येक व्यक्ती १००% संमोहनातून बाहेत येतेच. संमोहनकार जागे होण्याच्या सूचना देण्यास विसरला, तरीपण ती व्यक्ती आपोआप काहीवेळाने जागी होते. आजपर्यंत संमोहनातून बाहेर व्यक्ती बाहेर आली नाही असे  एकही उदाहरण या जगात नाही. 

संमोहनकाराच्या सूचनाच संमोहित व्यक्ती तंतोतंत पालन करत असते पण दिलेल्या सूचना मानसिक, भावनिक, आध्यत्मिक पातळीच्या विरुद्ध असल्यास संमोहित व्यक्ती ताबडतोब संमोहनातून बाहेर येते. संमोहित व्यक्ती कधीच संमोहनकाराच्या आधीन नसते. मनाविरुद्ध दिलेली कुठलीच सूचना संमोहितव्यक्ती पाळत नाही.  

No comments:

Post a Comment